Jio bonas:Fact Check : तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला बंपर बोनस मिळणाराय.. अंबानी ग्राहकांना 5 हजार रुपये खात्यात टाकणार असल्याचा दावा करण्यात आलाय.. तसा मेसेज व्हायरल होतोय.. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली.. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
Jio bonas तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होणार आहेत.. होय, असा दावा करण्यात आलाय.. कारण, जिओ कंपनीला 8 वर्षे पूर्ण झाल्याने हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय.. सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत.. त्यामुळे खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का..? याची आम्ही पडताळणी सुरू केली.. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात..
व्हायरल मेसेज Jio bonas
जिओला 8 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्राहकांना 5 हजार रुपयांचा बोनस दिला जातोय. पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा. यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात. हा मेसेज व्हायरल झाल्याने याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते.. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत माहिती मिळवली असता असा जिओने मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं.. मग ही लिंक कुणी पाठवली.. अशा लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात.. याबाबत आम्ही सायबर एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली.. त्यामुळे – आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात..
– पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते
– कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफरसाठी लिंक देत नाही
– सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात
– मेसेजसोबतची लिंक उघडून पाहू नका
आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना 5 हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय..त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका.. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते..