PM kisan instalment:राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार 4 हजार जमा होणार, येथे पहा गावानुसार यादी

PM kisan instalment: केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून त्या माध्यमातून वर्षाता सहा हजार रुपये देण्यात येतात.

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या (Namo Shetkari Samman Nidhi) गेल्या दोन हप्त्यांचे चार हजार रुपये हे बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार 4 हजार जमा होणार

येथे पहा गावानुसार यादी

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 200 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. डिसेंबर  ते मार्च महिन्यातील तिसरा हप्त्यासाठी  दोन हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 6 हजारांच्या मदतीएवढीच राज्य सरकारची 6 हजार रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती.

केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाचवेळी 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (डिसेंबर 23 ते मार्च 2024) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ  राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)

– नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
– या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
– केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
– याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
– यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.

पीएम किसान निधी बुधवारी जमा होणार

पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेचा केंद्राचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही बुधवारी  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र  आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.

Leave a Comment