तुम्हाला PM Kisan चे 2,000 रुपये मिळणार की नाही? 2 मिनिटांत नाव चेक करा PM Kisan 20th installment

PM Kisan 20th installment : तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (PM-KISAN) लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

तुम्हाला PM Kisan चे 2,000 रुपये मिळणार की नाही?

2 मिनिटांत नाव चेक करा

तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (PM-KISAN) लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्यांतर्गत 2,000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र ही रक्कम केवळ पात्र व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

20वा हप्ता कधी जमा होणार?

PM-KISAN योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. ही योजना दर चार महिन्यांनी एक हप्ता देण्याची आहे, त्यामुळे 20 वा हप्ता जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण हप्त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

Jio bonas:Jio ग्राहकांना 5 हजार रुपये मिळणार? अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस ?

लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासायचे?

कधी कधी तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळले जाते. त्यामुळे आपल्या नावाची खात्री करणे आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. नंतर ‘Beneficiary List’ पर्यायावर क्लिक करा. आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. ‘Get Report’वर क्लिक करा.नंतर यादीत आपले नाव शोधा. जर तुमचे नाव यादीत नसेल, तर 20वा हप्ता मिळणार नाही. 

शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

PM Kisan 20th installment

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी Farmer ID साठी नोंदणी करणार नाही त्यांना पैशांचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment