Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Silver Rate Today: जागतिक राजकीय तणावामुळे तेल महाग झालं आणि त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी सोन्यावर विक्रीचा दबाव दिसून आला आणि सोनं स्वस्त झालं.

Gold Price Today: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली होती. 30 एप्रिलला सोनं तब्बल 3,000 रुपयांनी महाग झालं होत. त्यामुळे मे महिन्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोन्याचे भाव निराशाजनक राहतील असे वाटत असतानाच कालपासून सोन्याच्या भावात चांगलीच घसरण दिसून आली. काल तब्बल 2,200 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आजही सोनं स्वस्त झालं आहे. चला मग जाणून घेऊयात तुमच्या शहरातील आजचे ताजे दर….

भारतातील सोन्याचे भाव

Goodreturns वेबसाइट च्या ताज्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहे.

  • 24 कॅरेट सोनं – 1,50,420 रुपये प्रति तोळा आणि 15,0 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट सोनं – 1,37,990 रुपये प्रति तोळा आणि 13,799 रुपये प्रति ग्रॅम18 कॅरेट सोनं – 1,12,830 रुपये प्रति तोळा आणि 11,283 रुपये प्रति ग्रॅम

कालच्या तुलनेत आजचा भाव 330 रुपये प्रति तोळा इतका किंचित घसरला आहे.आजचा सोन्याचा भाव हा उच्चांकापासून प्रति तोळा तब्बल सोनं 30 हजारांनी स्वस्त आहे.

महाराष्ट्रातील सोनं भाव

Goodreturns वेबसाइट च्या ताज्या आकडेवारीनुसार सकाळी 9.30 वाजता राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांमधील सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहे.

  • 24 कॅरेट सोनं – 1,50,270 रुपये प्रति तोळा आणि 15,027 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट सोनं – 1,37,840 रुपये प्रति तोळा आणि 13,784 रुपये प्रति ग्रॅम18 कॅरेट सोनं – 1,12,680 रुपये प्रति तोळा आणि 11,268 रुपये प्रति ग्रॅम

कालच्या तुलनेत आजचा भाव 330 रुपये प्रति तोळा इतका किंचित वाढला आहे.तर मागच्या दोन दिवसांत सोनं सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झालं

आहे.

चांदीचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार आज महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो 2,65,000 रुपये आहे. आजचा चांदीचा भाव हा कालच्या तुलनेत 10 हजारांनी वाढला आहे. आज जरी भाव वाढला असला तरी सर्वकालीन उच्चांकापासून चांदी अजूनही तब्बल 1.55 लाख रुपयांनी

कमोडिटी बाजार

काल रात्री 11.55 वाजता देशांतर्गत कमोडिटी बाजार MCX वर सोन्याचा भाव 1,51,630 रुपयांवर बंद झाला आहे. तर चांदीचा तब्बल 9 हजार रुपयांनी वाढून 2,47,500 रुपयांवर बंद झाला

भाव आजून वाढणार?

2025 च्या वर्षभरात सोने-चांदीने चांगला परतावा दिला होता, मात्र अलीकडे उच्चांकी स्तरावरून खाली आल्यानंतर आणि अमेरिका-इराण तणावामुळे वाढलेल्या महागाईच्या चिंतेमुळे त्यांच्या तेजीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. मात्र तरीही सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपयांच्या वरच व्यवहार करत आहे. पण पुढच्या काळात भाववाढ होऊ शकते.तज्ञांच्या मते, जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, तर जेव्हा घसरतील तेव्हा टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे हा चांगला पर्याय ठरेल.

Leave a Comment