राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. ०१ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देणेबाबत शासन निर्णय GR
शासन निर्णय समक्रमांक दि. २५ फेब्रुवारी, २०२६ अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्याऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै, २०२५ पासून ५५% वरुन ५८% असा सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार दिनाक १ फेब्रुवारी, २०२६ पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. तसेच गाहे जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी गार्च, २०२६ या गहिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे (नोव्हेंबर, २०२५ ते जानेवारी, २०२६) आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित
त्यास अनुसरुन राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
या शासन निर्णयान्वये, सुधारित वेतन संरचनेत (७ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्याऱ्यांना दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे, २०२६ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
