3% महागाई भत्ता थकबाकी अदा करणेबाबत मोठी अपडेट! कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी

3% महागाई भत्ता थकबाकी अदा करणेबाबत मोठी अपडेट! कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 3 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) थकबाकी अदा करण्याबाबत वेतन व भविष्य निर्वाह पथकाने दिनांक 20 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रकानुसार, नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील 3 टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी माहे मे 2026 च्या नियमित वेतनामध्ये समाविष्ट करून अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि शिक्षकांना थकबाकीची रक्कम वेतनासोबत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासोबतच, सर्व संबंधित कार्यालयांना मे 2026 चे नियमित वेतन देयक 26 मे 2026 पर्यंत ऑनलाइन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महागाई भत्ता फरक तक्त्याची (DA Difference Statement) हार्ड कॉपी सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी नंतर शालार्थ प्रणालीमध्ये स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी वेळेत कार्यवाही करून थकबाकीचा समावेश नियमित वेतन देयकात करणे आवश्यक आहे.

याबाबतचे सविस्तर परिपत्रक खाली उपलब्ध असून, सर्व कर्मचारी, शिक्षक आणि वेतन विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेणे गरजेचे आहे.

3% DA थकबाकीबाबत सरकारचे महत्त्वाचे निर्देश; वेळेत कार्यवाही न केल्यास अडचण येऊ शकते!

Leave a Comment