Ladki Bahin Yojana : लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली! अंतिम यादी जाहीर; आता लाडकी बहीण योजनेचा ₹1,500 चा हप्ता
Ladki Bahin July Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत e-KYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून १.६६ कोटी पात्र महिलांची अंतिम यादी तयार झाली आहे. ऑगस्टचा हप्ता १२ ते १५ ऑगस्टपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.
मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने e-KYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या यादीमध्ये १ कोटी ६६ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) च्या मदतीने जमा केले जाणार आहेत.
तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज e-KYC अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखडलेली असल्यामुशे लाभ मिळू शकला नव्हता. मात्र आता अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला व बाल विकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेत ६६ लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये e-KYC पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.
पडताळणीदरम्यान अर्जदार सरकारी कर्मचारी आहेत का,आयकर भरतात का किंवा इतर सरकारी योजनांमधून समान प्रकारचा लाभ घेत आहेत का, याची तपासणी करण्यात आली. तसेच डेटाबेसमध्ये चुकीने समाविष्ट झालेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही योजनेतून वगळ्यात आले आहेत.
महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना सकोरे-बोर्डीकर यांनी सांगितलं की, e-KYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झाली आहे. अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आला आहे. जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, यापुढीचे सर्व हप्ते याच अंतिम यादीच्या आधारे दिले जाणार आहेत.
जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार?
सुत्रांनी दिलेल्य्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा १२ ते १५ ऑगस्टच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही.