Gold Price Update: सोन्या चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ; 10 ग्रॅमचा नवीन दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव… आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
Gold rate Today: सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता. मात्र अशातच आज 2 ऑगस्ट २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव… आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 2 August 2026)
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा २ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४३ हजार १६० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ३१, २३० आहे. तर चांदीचे दर २ लाख १७ हजार ७५० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव १ लाख ४३ हजार १६० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव १ लाख ३१ हजार २३० रुपये
चांदी १ किलो भाव २ लाख १७ हजार ७५० रुपये
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.