आनंदाची बातमी नव्या कायद्याने पगार घसघशीत वाढणार, शिक्षण, हॉस्टेल भत्त्यात होणार मोठी वाढ Employees Salary Hike 2026
Employees Salary Hike 2026:नव्या कायद्याने पगार घसघशीत वाढणार, शिक्षण, हॉस्टेल भत्त्यात होणार मोठी वाढ
देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या आयकर नियमांमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या …
देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या आयकर नियमांमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, ‘आयकर कायदा नियम मसुदा २०२६’मुळे (ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स) तुमच्या सॅलरी स्लिपचा चेहरामोहरा बदलणार आहे.
नव्या नियमांमुळे करपात्र उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार (टेक होम सॅलरी) लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
एज्युकेशन अलाउन्स : दरमहा १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये प्रति अपत्य.
हॉस्टेल अलाउन्स : दरमहा ३०० रुपयांवरून ९,००० रुपये प्रति अपत्य.
(एज्युकेशन अलाउन्स व हॉस्टेल अलाउन्स म्हणजे पालकांना आयकरात मिळणारी सवलत होय. सदर सवलत जास्तीत जास्त दोन अपत्यांसाठी घेता येते.)
फायदा किती : नव्या नियमांमुळे रमेशच्या वार्षिक करात
१,३३,६६० रुपयांची बचत होईल आणि दरमहा त्याच्या हातात ११,१३८ रुपये जास्त येतील.