LPG सिलेंडरवर नवा नियम लागू! आता फक्त एकच गॅस कनेक्शनवर करावं लागेल काम

LPG सिलेंडरवर नवा नियम लागू! आता फक्त एकच गॅस कनेक्शनवर करावं लागेल काम

LPG Update: तुमच्याजवळ PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असतील किंवा फक्त एलपीजी कनेक्शन असेल. तर आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी तुम्हाला माहिती असायलाच हवी.

तुमच्या घरात LPG सिलेंडर आणि PNG दोन्ही कनेक्शन आहेत का? आता सरकार ‘एक घर, एक कनेक्शन’ नियम कठोर करतेय. जागतिक ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियामधील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. यामुळेच ड्यूअल कनेक्शन ठेवणं नियमांच्या विरोधात मानलं जातंय. नवीन नियम तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि सरकारने हे पाऊल काल उचललं आहे चला पाहूया.

अनेक लोकांच्या घरात दोन गॅस कनेक्शन असतं. म्हणजेच पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन. तुमच्या घरातही असं असेल तर लवकरच तुम्ही चौकशीच्या कक्षेत येऊ शकतात. दिल्लीतून आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अशी घरं शोधली जात आहेत. जे दोन्ही कनेक्शनचा वापर करत आहेत. याचा हेतू ब्लॅक मार्केटिंग थांबवणे आणि सब्सिडी योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.

सरकारने कठोर आदेश जारी करत म्हटलंय की, ज्या घरांत पाइप्ड गॅस कनेक्शन आहेत. त्यांना आता सब्सिडीचा घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवण्याची परवानगी नसते. 14 मार्चला पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने आवश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत नियमांमध्ये बदल केलाय. नवीन नियमानुसार तुमच्याजवळ पहिल्यापासून PNG कनेक्शन असेल. तर तुम्हाला तुमचं LPG कनेक्शन सरेंडर करावं लागेल. हे पाऊल जागतिक ऊर्जा संकटा दरम्यान LPG ची मागणी कमी करणे आणि पीएनजी कनेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी उचललं आहे.

वाराणसी जिल्ह्यातही PNG व्यवस्था लागू झाल्यानंतर हजारो घरांना आपलं LPG कनेक्शन सरेंडर करावं लागेल. प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिलंय की, जिथे गेल (सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन) च्या माध्यमातून पीएनजीचा सप्लाय सुरू झाला आहे. तिथे LPG कनेक्शन ठेवणं नियमांच्या विरोधात असेल आणि उपभोक्तांना यासाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला गेलाय.

नवीन नियम फक्त उपभोक्तांवर नाही. तर तेल कंपन्या आणि गॅस डिस्ट्रीब्यूटवर लागू असतील. त्यांना निर्देश दिलेय की, ज्या घरांमध्ये पहिलेच पीएनजी कनेक्शन आहे. त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन दिलं जाऊ नये आणि सिलेंडर रिफिल करुनही मिळू नये. जॉइंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांच्यानुसार, देशभरात किती घरांमध्ये दोन्ही जोडण्या वापरल्या जात आहेत, याचे मूल्यांकन सरकार सध्या करतेय.

आतापर्यंत 43,000 हून जास्त उपभोक्त्यांनी स्वतः LPG कनेक्शन सोडले आहेत. कारण त्यांनी आता पाइप्ड नॅच्युरल गॅस वापरण्यास सुरुवात केली आहे. पण सरकार मानते की, अशा कुटुंबाची खरी संख्या यापेक्षा जास्त असू शकते. यामुळे डेटाच्या मदतीने त्या लोकांपर्यंत पोहोचलं जाणार आहे. ज्या लोकांनी एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन घेतले आहेत, त्यांच्यावर आता कारवाई होऊ शकते.

ज्या लोकांजवळ पीएनजी कनेक्शन नाही अशा लोकांना एलपीजी कनेक्शन देणे हाच सरकारचा उद्देश आहे. भआरत आपल्या गरजेचा सर्वात मोठा भाग बाहेरून पूर्ण करतो. जवळपास 88% कच्चे तेल, 50% नैसर्गिक कॅस आणि 60% LPG आयात करावा लागतो. पश्चिम आशियामध्ये तणावामुळे सप्लायवर परिणाम होतोय.

भारतातील एपीजीचा मोठा भाग (जवळपास 85–90%) सऊदी अरब आणि UAE सारख्या देशांमधून येतो. नुकतेच इराण आणि इस्रायलमध्ये तणावामुळे अनेक सप्लाय रूट प्रभावित झालेय. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुज, जिथून मोठ्या प्रमाणात इंधन सप्लाय होते. भारताने रशियासारख्या देशांकडून खरेदी करून कच्च्या तेलाची कमतरता बरीच पूर्ण केली आहे. पण नैसर्गिक गॅसचा सप्लाय ही चिंतेची बाब आहे. परिणामी, सरकारने सध्या नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचे काम थांबवलेय.

गॅसची कमतरता फक्त घरांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट सारख्या व्यावसायिक सेक्टरवरही याचा परिणाम होतोय. त्यांना एलपीजी कपातीचा समाना करावा लागतोय. यासोबतच अनेक औद्योगित युनिट्समध्येही गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम झालाय. त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय.

Leave a Comment