मे 2026 वेतनाबाबत मोठे अपडेट! वित्त विभागाचे नवीन परिपत्रक जारी

मे 2026 वेतनाबाबत मोठे अपडेट! वित्त विभागाचे नवीन परिपत्रक जारी

राज्य सरकारी कर्मचारी आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वित्त विभागाने दि. 22 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले असून, माहे मे 2026 देय जुन 2026 वेतन देयक प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या या नव्या परिपत्रकानुसार, “नवीन सेवार्थ प्रणाली” (Sevaarth System) प्रभावीपणे लागू करण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतील मध्यम व लघु आस्थापनांना नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः पुणे विभागातील सर्व कोषागारांअंतर्गत येणाऱ्या मध्यम व लघु आस्थापनांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आता केवळ नवीन सेवार्थ प्रणालीतूनच वेतन देयके प्रक्रिया करावी लागणार आहेत.

यामुळे माहे मे 2026 चे देय जुन 2026 पासून जुनी सेवार्थ प्रणाली पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, जुन्या प्रणालीतून कोणतेही कामकाज करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही तर वेतन देयके तयार होण्यास उशीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्मचारी वेतन उशिरा झाल्यास त्यासाठी वित्त विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये वेळेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Leave a Comment