राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रका मध्ये मोठा बदल
School Reopen: मोठी बातमी ! राज्यातील शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर
MAHARASHTRA SCHOOL REOPENING DATE: राज्यातील शाळा कधीपासून सुरू करायच्या याबाबत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून वेळापत्रक आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याबाबत शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय
शिक्षण विभागो शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर केल्या
महाराष्ट्रातील बहुतांश शाळा १५ जून २०२६ पासून नियमित वेळेनुसार सुरू होणार
विदर्भातील शाळा उष्णतेमुळे २२ जून २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय
उन्हाळ्या सुट्ट्या संपल्या असून आता शाळा कधीपासून सुरू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी आणि पालक शाळा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी अत्यंत महत्वाचे परिपत्रक जारी केले. त्यामध्ये त्यांनी राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याच्या तारखा जाहीर केल्या. कडक उन्हामुळेविदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी सोमवारी २२ जून रोजी सुरू होतील. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियमित वेळापत्रकानुसारच सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७सुरू करणेबाबत संदर्भक्र. २ अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवारी १५ जून, २०२६ पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.’
तसंच, ‘विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने महत्वाचा निर्णय घेतला. अद्यापही विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार २२ जून, २०२६ पासून सुरू होतील. तसेच २२ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत विदभांतील शाळा सकाळच्या सत्रात भरतील. जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत भरतील. तर उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवारी १५ जून, २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील.’, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.