लग्नासाठी जोडीदार निवडताना कधीच करू नये या 4 चुका, चाणक्य नीती…

लग्नासाठी जोडीदार निवडताना कधीच करू नये या 4 चुका, चाणक्य नीती…

chanakya niti : सोशल मीडिया, मॅट्रिमोनियल अॅप्स, अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज अशा कोणत्याही माध्यमातून जोडीदार निवडताना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे…

chanakya niti on life partner : सध्या लग्नाचा विषय निघाला की, अनेकांच्या मनात विविध प्रश्न आणि चिंता निर्माण होतात. समाजात घडणाऱ्या काही गंभीर वैवाहिक प्रकरणांमुळे समोरची व्यक्ती आपल्याबरोबर प्रामाणिक हेतूने राहतेय का, असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. सोशल मीडिया, मॅट्रिमोनियल ॲप्स, अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज अशा कोणत्याही माध्यमातून जोडीदार निवडताना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला आणि विश्वासू जीवनसाथी मिळणे ही आजच्या काळात अनेकांसाठी मोठी गोष्ट ठरत आहे.

चाणक्य नीतीनुसार, लग्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या काही सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये हे गुण आढळले. तर अयोग्य मानले जातात. आज, या लेखात आम्ही तुम्हाला याच गुणांविषयी माहिती देणार आहोत. जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या संभाव्य जोडीदारामध्ये खालीलपैकी कोणताही गुण आढळला, तर तुम्ही वेळीच लक्ष दिले पाहिजे.

जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ ४ गोष्टी ठेवा लक्षात

अति गोड बोलणे

जर तुम्हाला तुमचा जीवनसाथी म्हणून अशी व्यक्ती सापडत असेल जी अति गोड बोलणारी असेल. तर चाणक्य याला चांगला गुण मानत नाहीत.अति गोड बोलणारी व्यक्ती अनेकदा स्वार्थासाठी किंवा फायदा करण्यासाठी कौतुक करत असते. अशा लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांचा हेतू वेगळा असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी सावध राहणे आणि योग्य अंतर राखणे अधिक हिताचे ठरते.

संयम

आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव असतो आणि जी सहज अधीर होते. ती कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्यात कमी पडू शकते. अशा स्वभावाचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य जोडीदार निवडताना त्याच्या स्वभावात संयम आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार प्रत्येक परिस्थितीत उतावळेपणे वागत असेल, तर ते नाते पुढे नेण्यापूर्वी नीट विचार करणे योग्य ठरू शकते.

चंचल आणि असंतुष्ट

समाधान हा माणसाच्या चारित्र्याचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. पण, चंचल आणि असंतुष्ट व्यक्तीसुद्धा चुकीचा मार्ग स्वीकारू शकते. एक असंतुष्ट जोडीदार वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करू शकतो. चाणक्य नीतीनुसार, तुम्ही चंचल आणि असंतुष्ट व्यक्तीला आपला जोडीदार म्हणून निवडू नये. असा जोडीदार आयुष्याच्या मध्यातच तुम्हाला सोडून देऊ शकतो.

उघडपणे गोष्टी सांगणे

जर तुमचा जोडीदार सर्वांसमोर गुपिते उघड करत असेल. तर त्याला चांगला जोडीदार मानले जात नाही. तुम्ही अशा व्यक्तीला आपला जीवनसाथी म्हणून निवडणे टाळावे. असा पुरुष किंवा स्त्री घर संभाळण्याऐवजी उद्ध्वस्त करू शकते. चांगला जोडीदार तो असतो जो कधीही इतरांची गुपिते दुसऱ्यांना सांगत नाही.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Leave a Comment