DA Arrears Calculator: कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकी देण्याचे आदेश जारी; चेक करा
DA Arrears Latest New GR Maharashtra: राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत (DA Hike Arrears) एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची उर्वरित DA थकबाकी आता थेट रोखीने नवीन अपडेट नुसार काही कर्मचाऱ्यांना मे 2026 च्या तर काहीना जून च्या पगारासोबत मिळणार आहे. हा निर्णय सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सर्वांसाठी लागू असणार आहे.
DA Arrears Calculator: थकबाकी देकिती मिळणार? चेक करा
शासनाच्या वित्त विभागाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महागाई भत्ता वाढीचा महत्त्वपूर्ण आदेश काढला होता. या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२५ पासून वाढ करण्यात आली होती. हा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के असा सुधारित करण्यात आला होता. या वाढीनुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून महागाई भत्ता रोखीने देण्यास सुरुवात झाली होती.
तसेच जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ च्या वेतनासोबत देण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश त्यावेळी स्वतंत्रपणे काढले जातील असे शासनाने स्पष्ट केले होते.
DA Hike Arrears मे महिन्याच्या वेतनासोबत
कर्मचारी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, तो शासन निर्णय अखेर १८ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ताज्या निर्णयानुसार, १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी (DA Hike Arrears) आता कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या मे २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्याचा पगार हा वाढीव रकमेसह कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
थकबाकी किती मिळणार?
18 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार, महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, यात एकूण ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. आता आपल्याला नोव्हेंबर २०२५, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या तीन महिन्यांची वाढीव रकमेची थकबाकी मिळणार आहे.
उदाहरण:
समजा, तुमचे मूळ वेतन (Basic Pay) ५०,००० रुपये आहे.
तर, ५०,००० रुपयांवर ३ टक्के वाढीव महागाई भत्ता काढल्यास, तो एका महिन्यासाठी १,५०० रुपये इतका होतो. आता ही वाढ आपल्याला तीन महिन्यांसाठी (नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी) मिळणार आहे. म्हणून, १,५०० रुपये गुणिले ३ महिने = ४,५०० रुपये.
याचा अर्थ, जर तुमचे मूळ वेतन ५०,००० रुपये असेल, तर तुम्हाला मे महिन्याच्या पगारात ४,५०० रुपये थकबाकी म्हणून मिळतील.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे मूळ वेतन वेगवेगळे असल्यामुळे, रक्कम कमी-जास्त होईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूळ वेतनाचा (Basic Pay) ३ टक्के काढून, आलेल्या रकमेला ३ ने गुणल्यास तुम्हाला तुमची अचूक थकबाकी किती हे सहज काढता येईल.
DA Arrears Calculator
या निर्णयाचा लाभ कोणाला मिळणार?
शासनाचा हा निर्णय केवळ मर्यादित कर्मचाऱ्यांपुरता नाही, तर सुधारित वेतन संरचनेत म्हणजेच ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
यासोबतच अनुदानप्राप्त संस्थांमधील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही ही महागाई भत्त्याची थकबाकी (DA Hike Arrears) लागू असणार आहे. यावर होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या लेखाशीर्षाखाली येते, त्यातून भागविण्याच्या स्पष्ट सूचना देखील शासनाने दिलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, प्रशासनातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा हा मोठा आर्थिक दिलासा आहे.