राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय दि. 26 मे 2026 रोजी जारी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय दि. 26 मे 2026 रोजी जारी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक 26 मे 2026 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वग्राम घोषणेबाबत नवीन नियम व तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

शासनाने कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत स्वग्राम सवलतीचा लाभ मिळत राहावा, या उद्देशाने स्वग्राम घोषित करण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत.

शासन निर्णयातील महत्वाचे मुद्दे :

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत प्रथम नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे अनिवार्य राहणार आहे.
  • नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशामध्येच स्वग्राम घोषणेच्या सूचनांचा समावेश करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
  • कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत फक्त एकदाच स्वग्राम बदलण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
  • ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी यापूर्वी प्रथम नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित केले होते आणि नंतर विवाह किंवा इतर कारणांमुळे स्वग्राम बदल केला असेल, अशा कर्मचाऱ्यांनाही या नव्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • अविवाहित महिला किंवा विवाहित महिलांनी विवाह, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्ता किंवा पुनर्विवाह यांसारख्या कारणांमुळे स्वग्राम बदलल्यास, शासन निर्णय लागू झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक राहणार आहे.
  • तसेच शासन निर्णयानंतर अशा घटना घडल्यास संबंधित महिला कर्मचाऱ्यांना त्या घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत स्वग्राम बदलणे आवश्यक राहणार आहे.

हा शासन निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात असून, स्वग्राम घोषणेसंदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत.

Leave a Comment