MPSC गट-क महाभरती 2026 : तब्बल 1,884 पदांसाठी सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख…

MPSC गट-क महाभरती 2026 : तब्बल 1,884 पदांसाठी सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख…

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क संवर्गातील एकूण 1,884 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
उद्योग निरीक्षक09
कर सहाय्यक79
तांत्रिक सहाय्यक04
लिपिक-टंकलेखक1676
एकूण पदे1884

शैक्षणिक पात्रता

उद्योग निरीक्षक – सिव्हिल अभियांत्रिकी पदवी / तंत्रज्ञान डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी

कर सहाय्यक – कोणतीही पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

तांत्रिक सहाय्यक – कोणतीही मान्यताप्राप्त पदवी

लिपिक-टंकलेखक – कोणतीही पदवी तसेच मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा

  • 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे असावे.
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अनाथ प्रवर्गासाठी 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू.

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹544
  • मागास / आ.दु.घ. / अनाथ प्रवर्ग: ₹344

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026

महत्त्वाचे

📌 एकूण 1,884 पदे
📌 सर्वाधिक 1,676 पदे लिपिक-टंकलेखक पदासाठी
📌 पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी
📌 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी ही संधी दवडू नये. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता व इतर अटी तपासून घ्या.

Leave a Comment