निवृत्तीवेतन धारकांसाठी मोठी खुशखबर! दि. 01 जानेवारी 2026 पासून डी.ए मध्ये 2% वाढ लागू ; आता मिळणार तब्बल 60% महागाई भत्ता

निवृत्तीवेतन धारकांसाठी मोठी खुशखबर! दि. 01 जानेवारी 2026 पासून डी.ए मध्ये 2% वाढ लागू ; आता मिळणार तब्बल 60% महागाई भत्ता

कमी सिबिल स्कोर तरीही मिळू शकते एक लाखापर्यंत कर्ज

राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत दि. 18 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, त्यानुसार दि. 01 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात (डी.ए) 2 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे.

या वाढीनंतर आता निवृत्तीवेतनधारकांना एकूण 60% दराने डी.ए मंजूर होणार आहे. त्यामुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 2550 रुपये, पहा अर्ज प्रक्रिया

शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र सरकारच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या दि. 24 एप्रिल 2026 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार ही वाढ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही या वाढीचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे, ही डी.ए वाढ दि. 01 जानेवारी 2026 पासून लागू असल्यामुळे संबंधितांना थकबाकीचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक आधार मिळणार असून, पुढील काळात त्यांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ दिसून येणार आहे.

Leave a Comment