राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्त्वाचे शासन निर्णय जारी State Employees New GR
State Employees New GR :राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्त्वाचे शासन निर्णय जारी
शासन निर्णय1)AMBIS (Automated Biometric Identification System) प्रणाली बंद करुन केंद्र शासनाची NAFIS (National Automated Fingerprint Identification System) प्रणाली सुरु करणेबाबत.
संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पोलीस दलासाठी AMBIS (Automated Multi-Modal Biometric Identification System) ही नविन प्रणाली खरेदी करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने, राज्यात गुन्हे अन्वेषण प्रक्रियेमध्ये बोटांचे ठसे, नोंदणी, जुळवणी व शोध कार्य कार्य अधिक कार्यक्षम, जलद व अचूक करण्याच्या उद्देशाने AMBIS (Automated Multi-Modal Biometric Identification System) प्रणाली कार्यन्वित आहे.
राष्ट्रीय स्तरावर एकसंध, केंद्रीकृत व परस्परसंवादी डेटाबेस निर्माण करण्यासाठी केंद्र शासनामार्फत NAFIS (National Automated Fingerprint Identification System) प्रणाली देशभर लागू करण्यात आलेली आहे. NAFIS प्रणालीद्वारे बोटांचे ठसे, तळहात ठसे व चेहरा माहिती यांचे डिजिटल संकलन, केंद्रीकृत संचयन व जलद शोध सुविधा उपलब्ध होऊन राज्यांमधील माहिती देवाणघेवाण सुलभ होते. त्यामुळे गुन्हेगार ओळख प्रक्रिया अधिक सक्षम, अचूक व वेळेची बचत करणारी ठरते.
सद्यस्थितीत AMBIS प्रणाली स्वतंत्र व मर्यादित स्वरूपाची असून राष्ट्रीय डेटाबेसशी पूर्णपणे एकात्मिक नाही. राज्यातील गुन्हे तपास कार्य अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने AMBIS
प्रणाली बंद करून NAFIS प्रणाली कार्यान्वित करणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने, AMBIS प्रणाली बंद करुन केंद्र शासनाच्या NAFIS प्रणालीचा सुरळीत व अखंडीत (Seamless) वापर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.