राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.25.05.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. दिनांक 25 मे 2026 रोजी राज्य शासनाने तब्बल 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले असून यामध्ये निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना, सेवा पुनर्विलोकन, संप कालावधी नियमितीकरण आणि नवीन पदनिर्मिती यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयांची मोठी चर्चा सुरू आहे.
📌 कोणते आहेत हे 4 महत्त्वाचे शासन निर्णय?
📥 सर्व 04 शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 01. गृह विभागाचा मोठा निर्णय
निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाहीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
👉 02. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश जारी
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (S-20) मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवेसंदर्भातील प्रक्रिया आता अधिक वेगाने होणार आहे.
👉 03. संपात सहभागी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा
सामान्य प्रशासन विभागाने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि राज्य सरकारी गट-ड कर्मचारी महासंघ यांच्या संपात सहभागी झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अनुपस्थिती कालावधी नियमित करण्यास मंजुरी दिली आहे.
👉 04. वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण GR
वस्तू व सेवा कर (GST) विभागाच्या आस्थापनेवर राज्यकर अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.