पंखा साफ करण्याची वायरल ट्रिक! पाहून तुम्हीही लगेच वापराल

पंखा साफ करण्याची वायरल ट्रिक! पाहून तुम्हीही लगेच वापराल

How To Clean Dirty Ceiling Fan Without Ladder : ही ट्रिक तुमचा खर्च वाचवेल याशिवाय स्टूलवर किंवा शिडीवर न चढता तुम्ही सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसांत पंख्याची साफ-सफाई करणं हे खूपच कठीण काम वाटतं. पंख्यांचे ब्लेड्स धूळ, घाण मातीमुळे खराब होतात आणि त्यावर काळपट थर येतो. पंखा स्वच्छ करण्यासाठी स्टूल, खुर्ची किंवा टेबलची आवश्यकता असते. पंखा स्वच्छ करताना खाली फरशीवर किंवा बेडवर सुद्धा धूळ पसरते आणि धुळीचे कण खाली पडतात त्यामुळे खोलीसुद्धा खराब होते. हे टाळण्यासाठी तुम्ही १ सोपा जुगाड करून पाहू शकता. (Easy Way To Clean Dirty Ceiling Fan Without Ladder Or Stool)

ही ट्रिक तुमचा खर्च वाचवेल याशिवाय स्टूलवर किंवा शिडीवर न चढता तुम्ही सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीन सामान खरेदी करण्याची काही गरज नाही घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरून तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ३ वस्तूंची आवश्यकता असेल. प्लास्टिक किंवा मेटलचं हँगर, एक जुनं सुती कापड किंवा टॉवेल आणि एक लांब काठी लागेल. (How To Clean Dirty Ceiling Fan Without Ladder)

पंखा स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक (Easy Trick To Clean Ceiling Fan)

सगळ्यात आधी हँगरला जुनं सुती कापड गुंडाळून घ्या. हँगर गुंडाळताना हँगरचा मधला भाग पूर्णपणे बंद होणार नाही याची काळजी घ्या. हँगरला तुम्ही गुंडाळलेले कापड पंखा स्वच्छ करण्याचं काम सोपं करेल. कापड गुंडताना १ छोटी ट्रिक वापरा, ती म्हणजे हँगरच्या मधली स्पेस जास्त ठेवू नका. ही स्पेस थोडी कमी करा. जेणेकरून हँगर वरच्या ब्लेडमध्ये व्यवस्थित अडकेल. अंतर व्यवस्थित असेल तर दोन्ही बाजूंची धूळ व्यवस्थित साफ होईल.

लांब काठी हँगरला बांधा

जेव्हा हँगरला कापड व्यवस्थित बांधाल तेव्हा एका मजबूत काठीनं व्यवस्थित बांधा. एकही रूपया खर्च न करता हा उपाय तुम्हाला करता येईल. हातात काठी पकडून ती हँगरच्या वरच्या भागात अडकवून हळूहळू खाली खेचा असं केल्यानं वर जमा झालेली सर्व धूळ कमी होईल आणि खाली फरशीवर घाण पडणार नाही. ज्यामुळे पंख्याचे ब्लेड्स चमकवण्यास मदत होईल.

जर पंखा जास्त चिकट किंवा घाण झाला असेल तर साफ करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या त्यात लिक्विड डिशवॉश आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून एक होममेड क्लिनर तयरा करा. नंतर हँगरवर लावलेलं कापड थोडं ओलं करून पुन्हा पंख्याचे ब्लेड्स साफ करून घ्या. ज्यामुळे जुना पंखा नवीन दिसेल.

Leave a Comment