माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत एक महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित

माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत एक महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित

दि. 13.05.2026 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत एक महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील निवडणूक व इतर शासकीय कामकाजासाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माहितीत संबंधित शिक्षकांची नावे, कार्यरत कार्यालय, तसेच प्रतिनियुक्तीचा कालावधी नमूद करण्यास सांगण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागात 3000 पदांची भरती

सदर परिपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक तसेच इतर शासकीय कामांवर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांच्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळा अथवा संस्थेमध्ये नियमितपणे सेवा बजावण्यासाठी वेळेत मुक्त करणे बंधनकारक राहणार आहे.

रात्री झोपण्यापूर्वी कुलर मध्ये या दोन गोष्टी टाका

तसेच, सादर करण्यात आलेल्या माहितीत समाविष्ट नसलेल्या परंतु इतर शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीतही संबंधित कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून त्यांनाही कार्यमुक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांनी तात्काळ त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

यासोबतच परिपत्रकात अत्यंत महत्वाची बाब नमूद करण्यात आली आहे की, संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश निर्गमित झाल्यानंतरही जर ते त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाहीत, तर अशा शिक्षकांचे माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व संबंधितांनी याबाबत दक्षता घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आले आहेत.

Leave a Comment