घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

घरभाडे भत्त्याच्या (HRA) पात्रतेसाठी वित्त विभागामार्फत दि. 07.10.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

सदर निर्णयानुसार ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्याच्या संदर्भात घरभाडे भत्ता (HRA) मिळण्यासाठी विहित करण्यात आलेल्या काही अटी व शर्ती वगळण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याच्या पात्रतेसंदर्भात दिलासा मिळणार आहे.

सदर तरतूद दि. 01.11.2016 पासून लागू करण्यात आलेली असून, यापूर्वी विहित करण्यात आलेली संबंधित अट आता वगळण्यात येत आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित तरतुदीनुसार घरभाडे भत्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, सदर शासन निर्णय हा न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे घरभाडे भत्त्याच्या पात्रतेसंदर्भात संबंधित शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती लागू राहतील.

Leave a Comment