Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; आता खात्यात जमा होणार ४५०० रुपये
Ladki Bahin Yojana : ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असताना, पात्र महिलांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. (Ladki Bahin Yojana)
पशुसंवर्धन विभागात 3000 पेक्षा जास्त पदांची भरती, इथे पहा सविस्तर जाहिरात
ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणा-या महिलांच्या बँक खात्यात रखडलेल्या तीन महिन्यांच्या अनुदानाचे एकत्रित ४५०० रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. (Ladki Bahin Yojana)
शेजाऱ्याने शेताचा बांध कोरला, तहसीलदार साहेबाकडे असा करा अर्ज
महायुती सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सुमारे दोन कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र, अर्जांची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. सध्या पात्र महिलांची संख्या १ कोटी ८९ लाखांवर स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. (Ladki Bahin Yojana)