WhatsApp Closed: सप्टेंबरपासून अँड्रॉइड फोन्सवर व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार: काय घडलंय नेमकं?
WhatsApp Closed: 5.1 यांसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्स असलेल्या उपकरणांना आता व्हॉट्सॲपचा सपोर्ट मिळणार नाही.
WhatsApp Closed: तंत्रज्ञान विश्वात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे आता लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही अजूनही जुना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. व्हॉट्सॲपने जाहीर केल्यानुसार, आगामी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ठराविक जुन्या अँड्रॉइड वर्जनवर हे ॲप चालणे बंद होईल.
कोणत्या फोनवर व्हॉट्सॲप बंद होणार?
ज्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 5.0 (Lollipop) किंवा अँड्रॉइड 5.1 यांसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्स आहेत, अशा उपकरणांना आता व्हॉट्सॲपचा सपोर्ट मिळणार नाही, असे व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे. थोडक्यात सांगायचे तर, ज्यांचा फोन अँड्रॉइड आवृत्ती 6.0 (Marshmallow) च्या खालील सॉफ्टवेअरवर चालतो, त्या ग्राहकांसाठी व्हॉट्सॲप सेवा पूर्णपणे खंडित केली जाईल.
का घेतला निर्णय?
मेटा (Meta) च्या मालकीच्या व्हॉट्सॲपने सुरक्षेच्या कारणास्तव हा कठोर निर्णय घेतला आहे. जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये नवीन सिक्युरिटी पॅचेस उपलब्ध नसतात, ज्यामुळे हॅकर्सकडून डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो. तसेच, नवीन AI चॅट, व्हॉट्सॲप प्लस) फीचर्स चालवण्यासाठी लागणारी तांत्रिक क्षमता या जुन्या फोनमध्ये नसल्याने व्हॉट्सॲपने हा बदल स्वीकारला आहे.
युजर्सना मिळणार आगाऊ सूचना
व्हॉट्सॲप थेट सेवा बंद न करता, प्रभावित होणाऱ्या युजर्सना सध्या त्यांच्या ॲपमध्ये अलर्ट किंवा सूचना पाठवत आहे. जर तुमच्या स्क्रीनवर ‘सॉफ्टवेअर अपडेट’ करण्याची किंवा ‘फोन बदलण्याची’ सूचना येत असेल, तर त्याचा अर्थ तुमचा फोन लवकरच या यादीत समाविष्ट होणार आहे.
चॅट बॅकअप घेणे अनिवार्य
सप्टेंबर महिना उजाडण्यापूर्वी प्रभावित युजर्सनी आपल्या महत्त्वाच्या मेसेजेसचा आणि फोटोंचा बॅकअप घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची सेवा एकदा बंद झाली, तर डेटा ट्रान्सफर करणे कठीण होऊ शकते. गुगल ड्राइव्हवर क्लाउड बॅकअप घेऊन ठेवा, जेणेकरून नवीन फोनमध्ये लॉग-इन केल्यावर तुमचे जुने संभाषण पुन्हा मिळवता येईल.
ग्राहकांकडे आता पर्याय काय?
ज्या ग्राहकांकडे जुने फोन आहेत, त्यांच्याकडे दोनच मार्ग उरतात: पहिला म्हणजे जर फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध असेल, तर तो किमान अँड्रॉइड 6.0 किंवा त्यावरील वर्जनवर अपडेट करावा. जर अपडेट उपलब्ध नसेल, तर व्हॉट्सॲप वापरत राहण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हाच एकमेव पर्याय उरतो.