70 किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 14 जिल्हे कोरडे

70 किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 14 जिल्हे कोरडे

पालघर-गुजरात संपर्क तुटला, ट्रेन बंद. महाराष्ट्रात ५ जिल्ह्यांना रेड/ऑरेंज अलर्ट, १४ जिल्हे कोरडे राहणार. जुलै अखेरीस मान्सून ब्रेकची शक्यता.

Weather Update: पालघर, डहाणूपासून पुढे गुजरातकडे जाण्यासाठी मार्गच पाण्याखाली गेल्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. ट्रेन तूर्तास बंद आहेत, रस्ते वाहतुकीसाठी अडथळा येत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज पुन्हा एकदा रेड ते ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकीकडे 5 जिल्ह्यांसाठी रेड ते ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पाऊस ताशी ७० किमी वेगाने वादळी वारे वाहतील आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत धो धो पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मात्र 14 जिल्हे आजपासून कोरडेच राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कोणताही अंदाज नसेल. काही भागात एखादी सर पडू शकते मात्र हवामान दमट उष्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पावसाची जी तूट होती ती आता २४ वरुन १९ टक्क्यांवर आली आहे. ती चांगली गोष्ट आहे. मात्र जुलै अखेरीस पुन्हा मान्सून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. आता सायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरातच्या जवळ आलं आहे.

आसाममध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे ज्याची टर्फ लाइन ही मागच्या दिशेनं येऊन अरबी समुद्रापर्यंत जात आहे. त्यामुळे गुजरातचा काही भाग आणि कोकण, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि घाटमाथ्यावर सलग तिसऱ्या दिवशी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे मात्र बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी आहे. इतका पाऊस कोसळत असतानाही १४ जिल्हे मात्र कोरडे राहणार आहेत. जिथे अजूनही मान्सूनच्या पावसाची मोठी तूट जाणवत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पाऊस राहणार नाही. तर विदर्भातील काही भागात आज पाऊस अगदी रिमाझिम होऊ शकतो.

मध्य महाराष्ट्रात देखील म्हणावा तसा मुसळधार पाऊस राहील असं नाही. त्यामुळे १४ जिल्ह्यांमध्ये टेन्शन वाढलं आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. यवतमाळ, वर्धा, वाशीम, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज नाही. तर जुलै अखेरपासून पुन्हा पावसाची तूट जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता वाढू शकते.

Leave a Comment