Land Record : वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते, मात्र, आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत केवळ १०० रुपयांच्या स्टेप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.
अर्जासोबत काय हवे…..
महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची महसूल पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे.
शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव, सहधारकाच नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेतजमिनीचा वर्ग, जिरायत / बागायत जमिनीचा तपशील. एकूण गटाचे क्षेत्र, अर्जदार व सहधारकाचे त्यातील क्षेत्र,
१०० रुपयाच्या स्टेप पेपरवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतुःसीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकाची स्वाक्षरीसह समती, आदी बाबीची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे..
मोठी बातमी सार्वजनिक सुट्ट्या ची यादी झाली जाहीर ! Pdf यादी येथे डाऊनलोड करा…
या तरतुदींना अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकन्याच्या शेतजमिनीचे अर्ज विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरुपात है काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे. दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.