जमीन विक्री आणि खरेदीसाठी हे नवीन नियम आहेत:
नियम 1: जमीन खरेदीची नोंदणी
सर्व्हे नंबरचे क्षेत्र 2 एकर असल्यास, तुम्ही या सर्व्हे नंबरमध्ये 1, 2, किंवा 3 एकर जमीन खरेदी केल्यास नोंदणीला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे ही शेतजमीन खरेदी केल्यास ती तुमच्या नावावर नोंदवली जाणार नाही.
मात्र, सर्व्हे नंबरमध्ये १ किंवा २ गुंठे जमिनीचा समावेश असेल, तर १ किंवा २ गुंठे जमिनीचा व्यवहार जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने नोंदविला जाऊ शकतो.
नियम 2: प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी करार केलेली जमीन
प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी जमिनीसाठी कोणत्याही पक्षकाराने यापूर्वी करार केला असेल, तर अशा जमिनीच्या विक्री व खरेदीसाठी सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
नियम 3: स्वतंत्रपणे तयार केलेल्या भूखंडांची विक्री
सरकारी भूमी अभिलेख विभागांतर्गत स्वतंत्र भूखंड निश्चित केला गेला असेल किंवा त्याची गणना केली असेल आणि त्याचा स्वतंत्र सर्वेक्षण नकाशा दिला असेल, तर अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. तथापि, जर असा भाग सामायिक करायचा असेल तर, अटी व शर्ती लागू होतील.