Dhananjay Munde on Pik Vima : 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

Dhananjay Munde on Pik Vima : 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

 

Dhananjay Munde on Pik Vima : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Pik Vima) देय असलेले 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये,

31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

 

 

Dhananjay Munde on Pik Vima : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Pik Vima) देय असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.

 

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.Dhananjay Munde on Pik Vima

हे पण वाचा:  गॅस सिलेंडरची किंमत: अरे देवा! LPG गॅस सिलेंडर पुन्हा महाग, जाणून घ्या काय आहे नवीन किंमत.

 

चालकांनी लक्ष द्यावे, 10 ऑगस्ट पासून लागू होणार नवीन नियम,

भरावा लागणार दंड

 

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा

काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.Dhananjay Munde on Pik Vima

हे पण वाचा:  pm kusum payment option:कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन, येथे पहा सविस्तर माहिती

जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर,

👉यादीत नाव पहा

 

5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते. याबाबतची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .Dhananjay Munde on Pik Vima

कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना फायदा

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीपोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते. त्याच्या वाटपाची कारवाई सुरु आहे. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे पण वाचा:  Mahindra Bolero चा Next Gen . लक्झरी फीचर्स आणि डॅशिंग लुकसह मॉडेल लवकरच लाँच होणार , VIP फीलिंग फक्त 9 लाखांमध्ये मिळणार ..!

तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा…

 

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.दिलीपराव बनकर, आ.सरोजताई अहिरे, आ.नितीन पवार, आ.सुहास कांदे, माजी आमदार जयंत जाधव आदींनी पीक विम्याच्या संदर्भात आपल्याकडे विषय उपस्थित केले होते असे मुंडे म्हणाले. या सर्वांसह लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.Dhananjay Munde on Pik Vima

 

5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये,

31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top