girl lavani video viral : “गौतमी पाटीलही या तरुणींसमोर फेल”; सादर केली सुरेख लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

girl lavani video viral : “गौतमी पाटीलही या तरुणींसमोर फेल”; सादर केली सुरेख लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

 

Girl Lavani Video Viral : लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणी सर्वत्र ओळखली जाते. अनेक लावणी कलाकार सुरेख लावणी सादर करत असतात. सोशल मीडियावर लावणी सादर करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. सर्वच वयोगटातील कलाकार लावणीवर सुंदर व्हिडीओ बनवित असातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी तुफान लावणी करताना दिसत आहे. त्यांची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हे पण वाचा:  सहा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा? हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय होणार का? (कर्जमाफी महाराष्ट्र)

 

Girl Lavani Video Viral

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणी पायात घुंगरू घालून लावणी सादर करताना दिसत आहे. त्यांनी अप्रतिम लावणी सादर केली आहे. दोघींच्या लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या दोघींची लावणी पाहून तुम्हाला अस्सल लावणी कलावंत आठवतील. दोघीही तरुणी एकमेकींना टक्कर देत लावणी सादर करत आहे. काही लोकांना ही लावणी पाहून अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर मोठ्या अक्षरात लिहिलेय,”याला म्हणतात तोडा” लावणी तोडा हा एक सुंदर प्रकार आहे. लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान आहे. अनेक तरुण मंडळी उत्साहाने लावणी सादर करताना दिसतात. पूर्वी फक्त स्त्रिया लावणी सादर करायच्या आता त्यात पुरुषांची सुद्धा संख्या वाढताना दिसत आहे.Girl Lavani Viral

हे पण वाचा:  SBI Mudra Loan : 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज …!

 

Girl Lavani Video Viral

 

lavanipremi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कोणाचा तोडा आवडला मग” या अकाउंटवरुन या पूर्वी सुदधा असे अनेक लावणीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.काही युजर्सनी या तरुणींची तुलना गौतमी पाटीलबरोबर केली आहे.गौतमी पाटील ही एक लोकप्रिय नृत्यांगणा आहे. एका युजरने लिहिलेय, “ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर सादर होणारा डान्स म्हणजे हे एक उदाहरण” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच छान अप्रतिम दोघी पण याला म्हणतात खरी लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “दोघी पण शेराला सव्वाशेर आहेत.तोडीस तोड” अनेक युजर्सनी या Girl Lavani Viral Video व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हे पण वाचा:  trending pm kisan list:आज PM किसान 17वा हप्ता करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लाभार्थी यादी जाहीर, या दिवशी खात्यात येणार 2000-2000 रुपये!

 

Girl Lavani Video Viral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top