Crops Insurance 2023:- महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष बागा आणि उसाचे उभे पीक झोपले असून भाजीपाला पीके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त झाले आहेत.
द्राक्ष बागांचा पाला पूर्णपणे पडला आहे, मणी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने झटका दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया गेला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेल्या पिकांचा आणि फळपिकांचा विमा काढला असेल. तर गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विम्याची तक्रार करणे आवश्यक आहे.Crop Insurance 2023
घटना किंवा नुकसान झाल्यानंतर ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत ही तक्रार करणे आवश्यक असते. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली नाही तर भरपाई मिळणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने कशी करायची? यासंदर्भातील माहिती सोप्या भाषेत आपण पाहूया.Crops Insurance 2023
महत्त्वाची टीप – ज्या शेतकऱ्यांनी संबंधित हंगामातील पिकाचा विमा भरला आहे, केवळ त्याच शेतकऱ्यांना विमा तक्रार करता येणार आहे याची नोंद घ्यावीCrops Insurance 2023