Driving Licence Free Apply 2023 : ड्रायव्हिंग लायसन मोफत मध्ये घरपोच मिळणार नियम व अटी पहा.

Driving Licence free Apply : ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालवण्याचा परवाना) बनवणं हे आपल्या देशातलं एक डोकेदुखीचं काम आहे.

आरटीओमध्ये अर्ज करा, परीक्षा द्या, ती पास झाल्यावर आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्या आणि त्यानंतर एक दोन महिन्यांनी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं.

त्याचबरोबर वर नमूद केलेली बरीचशी कामं करण्यासाठी आरटीओमधल्या वेगवेगळ्या रांगांमध्ये ताठकळत उभं राहावं लागतं.

मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं सोपं होणार आहे. युनियन मिनिस्ट्री ऑफ रोड अँड मोटरवेजने नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या ,

नियमांमध्ये (Driving Licence new rules) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन नियम या महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून लागू झाले आहेत. Free Driving Licence Apply 

हे पण वाचा:  pm internship cheme : मोदी सरकारचा मोठा निर्णय.! मोदी सरकार देणार दर महिन्याला तरुणांना पाच हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज

नवीन नियम लागू झाल्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी नागरिकांना आरटीओच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागणार नाही.

तसेच आता लोकांना आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट न देता ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतं. मात्र यादरम्यान, एक महत्त्वाचा बदल देखील करण्यात आला आहे,

ज्यामुळे आरटीओऐवजी आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सचं महत्त्व वाढणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेटर्सना सशक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यांना आता ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे,

त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेटर्सकडून प्रमाणपत्र मिळवावं लागणर आहे.

हे पण वाचा:  सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ: सणासुदीच्या खरेदीदारांवर परिणाम

यादरम्यान, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, या ट्रेनिंग सेटर्सची वैधता पाच वर्षांसाठी असणार आहे. या पाच वर्षांनंतर ते रिन्यू करावे लागतील.

हे ट्रेनिंग सेटर्स किंवा प्रशिक्षण केंद्रे राज्य परिवहन प्राधिकरण किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत असतील. ज्या लोकांनी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला आहे.

त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्समध्ये आपलं नाव नोंदवावं लागणार आहे. तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या प्रशिक्षण केंद्रांवरच घेतली जाईल.

जे लोक ड्रायव्हिंग टेस्ट पास होतील त्यांना ट्रेनिंग सेटरकडून प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही आरटीओकडे ड्रायव्हिंग

लायसन्ससाठी अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आरटीओ टेस्टशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. Free Driving Licence

हे पण वाचा:  या 40 तालुक्यात झाला दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार आता 27500 रु. ही पहा यादी…Drought Declared Maharastra

अशा प्रकारची प्रमाणपत्र सर्वच ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्समध्ये मिळणार नाहीत. सरकार आणि आरटीओने अधिकृतपणे नेमलेल्या ट्रेनिंग सेंटर्सवरच हे प्रमाणपत्र मिळेल.

या अधिकृत ट्रेनिंग सेंटर्समध्ये सिम्युलेटर्स असतील आणि ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक देखील उपलब्ध असतील.

या केंद्रांमध्ये हलकी मोटार वाहनं,मध्यम आणि अवजड मोटार वाहनांचे प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.

२९ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर तुम्हाला तुमच्या प्रशिक्षण केंद्रावरच टेस्ट द्यावी लागेल.

तिथे तुमची थिअरी (लेखी परीक्षा) आणि प्रॅक्टिकल (ड्रायव्हिंग टेस्ट) अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top