Land Record: जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे.
या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे.
या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक
तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे,तर या तंत्रज्ञानामुळे पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे.
जमीन मोजणीसाठी सध्या भूमि अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनच्या साहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते.
या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.
जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
तुमचा सिबिल स्कोर किती ते येथे पहा
कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येते आहे. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी एक दिवस ते चार दिवस लागत होते, ते काम आता अर्ध्या तासात होणार आहे.
त्यामुळे दिवसभरात किमान तीन ते चार मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होईल. त्यासाठी संपूर्ण राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे.
आता त्या कॉर्स स्टेशनच्या मदतीने मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सहा विभागातील या तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणीचे काम सुरू केले आहे.
त्यामध्ये हवेली तालुक्याचा समावेश आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
येथे उभारले स्टेशन…
शिरूर, मावळ, पुरंदर आणि दौंड या चार ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारले आहेत. एक कॉर्स स्टेशन भोवतीच्या ३५ किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे.
कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून, हे रीडिंग दिसेल. राज्यात अशा प्रकारे ४०० रोव्हर बसविले आहेत.