PM Kisan Yojana : ‘पीएम किसान’चे काम पंधरा दिवस ठप्प; शेतकऱ्यांची मोठी गैरसोय, कधी सुरु होणार कामकाज?
PM Kisan Yojana: पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी सरकारकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली. पनवेल तालुक्यात २९ हजार ५०० शेतकरी आहेत. यापैकी १० हजार ५०० शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत.
PM Kisan Yojanaया योजनेतून शेतकऱ्याला तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तसेच आता राज्य सरकारनेही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य सरकारकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत.
या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो; परंतु काही पती-पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.PM Kisan Yojana
‘पीएम किसान’चे काम पंधरा दिवस ठप्प; शेतकऱ्यांची मोठी गैरसोय, कधी सुरु होणार कामकाज?
त्यामुळे आता पात्र लाभार्थीचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती किंवा पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी नसेल अथवा कर भरत नसेल, तर अशा शेतकऱ्यांना नोंदणी करून लाभ घेता येणार आहे.PM Kisan Yojana
अपात्र नसूनही लाभ
पीएम किसान योजनेत ऑनलाइन पोर्टलवरून स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा (शेती) नसताना अनेकांनी सुरुवातीपासून नोंदणी केलेली आहे, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ आजही मिळत आहे.
सोबतच कित्येकांना पती, पत्नी व काही जणांचे; तर घरात मुलांचीसुद्धा नोंदणी केली असल्याने एकाच घरात तीन ते चार जणांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे.
नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा.
२. अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा असेल, तर एकच फेरफार.
३. फेब्रुवारी २०१९ नंतर मृत्यू झाला असेल, तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार
४. पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड
५. १२ अंकी रेशन कार्ड
PM Kisan Yojana : अजून खात्यावर जमा झाला नाही १७वा हफ्ता? या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून जाणून घ्या अपडेट