पिक विमा यादी 2023-24 महाराष्ट्र | Pik Vima Yadi 2023-24 Maharashtra

संपूर्ण देशामध्ये Pradhan Mantri Pik Bima Yojana राबविण्यात येते, या योजनेअंतर्गत देशातील मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभाग नोंदवतात, या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन्नात घट, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांनी शेतीवर संकट आल्यास शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळवून देणे हा आहे, पिक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे हा सुद्धा एक प्रकारचा मानला जातो, देशातील शेतकरी विविध प्रकारच्या पिकासाठी पिक विमा काढतात, पिक विम्याची ठराविक रक्कम ठरवून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येतो.

शेती करत असताना विविध प्रकारच्या आपत्ती उद्भवतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जर प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला असेल तर झालेल्या नुकसान भरपाई ची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात येते, पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये ही विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, कीड रोग, चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी अशा प्रकारच्या संघटनांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते तसेच पावसाचा पडलेला खंड व यात जर पावसाचा खंड २१ दिवसापेक्षा जास्त काळाचा असेल व यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही 25 टक्के अग्रीम पीक विम्याच्या स्वरूपामध्ये देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात थोड्या प्रमाणात पीक विमा योजनेअंतर्गत दिलासा मिळतो.

पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये पिक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभाग नोंदवतात, खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये पिक विमा योजना राबविण्यात येते खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, तूर तसेच विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे तर रब्बी हंगामामध्ये हरभरा, भुईमुग विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे त्यामुळे अशा पिकांना Protection of crop insurance मिळावे या कारणाने अनेक शेतकरी सहभाग नोंदवतात. पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई पिक विमा मिळणे यावरून थोडे आर्थिक स्थैर्य लाभन्यास मदत होते.

हे पण वाचा:  Agri विज्ञान केंद्र : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्रात 1 रुपयात पिक विमा योजना

महाराष्ट्रामध्ये 2023 पासून खरीप तसेच रब्बी हंगामासाठी एक रुपयात पिक विमा योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना पिक विमा काढत असताना आर्थिक स्थिती योग्य नसल्याने पिक विमा योजनेत सहभाग घेण्याची इच्छा असून सुद्धा नोंदवता येत नव्हता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळावा या कारनाने एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत राज्यांमध्ये, एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात येणार अशा प्रकारचा GR काढून एक रुपयात पिक विमा योजना राबवणे चालू करण्यात आलेले आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग वाढलेला आहे महाराष्ट्रातील रूपयात पीक विमा योजना चालू झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी Participation in crop insurance scheme नोंदवत आहे. परंतु या पूर्वी मात्र 1 रूपयात पिक विमा योजना नसल्याने योजनेत सहभाग मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती परंतु सुविधा अंमलबजावणीत आल्यानंतर सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एक रुपया देऊन शेतकऱ्यांना पिक विमा योजना सहभाग नोंदवणे शक्य झालेले आहे.

हे पण वाचा:  Crop Insurance maharashtra Lists :पीक विमाचे हेक्टरी 35,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा

पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैशाची मागणी

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना उतरवता आला तसेच रब्बी हंगामामध्ये एक रुपयात पिक विमा योजना उतरवता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यात सहभाग नोंदवत असताना महाराष्ट्रातील शेतकरी एक रुपया व्यतिरिक्त जास्त रुपये सीएससी सेंटर धारकांना देऊ नये अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. विमा अर्ज भरत असताना सीएससी सेंटर धारकाकडून शेतकऱ्याला जास्त प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

शासन अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे तसेच सीएससी सेंटर धारकाला सुद्धा आवाहन देण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात पैशाची मागणी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, शेतकऱ्याच्या प्रत्येक एका अर्जा मागे शासन अंतर्गत सीएससी सेंटर धारकाला चाळीस रुपये प्रति अर्ज याप्रमाणे पैसे देण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्यांकडून अर्ज भरताना पैशाची मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरताना फक्त एक रुपया देऊनच अर्ज भरावा. अन्यथा जर तुम्हाला अतिरिक्त पैशाची मागणी केली जात असेल तर शेतकरी सहजरित्या तक्रार नोंदवू शकतात.

हे पण वाचा:  Government cycle Schemes: इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना शासनाकडून मिळणार 5000 रुपये

पिक विमा योजना आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्याच्या जमिनीचा पुरावा म्हणून मुख्य म्हणजे सातबारा

पिक विमा घोषणापत्र

पिकाची लागवड झाल्याबद्दल घोषणापत्र

अशाप्रकारे वरील दिलेल्या कागदपत्रावरून शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये एक रुपयाची पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येतो.

पिक विमा अर्ज प्रक्रिया

शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागतो त्यासाठी pmfby.gov.in ही वेबसाईट ओपन करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो अथवा शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.

शेतकऱ्यांनी Crop Insurance Application भरल्यानंतर शेतकरी हा पात्र झालेले आहे;असे काहीही नाही त्यामुळे शेतकऱ्यानी त्यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास व शेतीचे नुकसान झाल्यास Need to claim आहे, 72 तासाच्या आत क्लेम शेतकऱ्यांना करावा लागतो. क्लेम विमा कंपनी नंतर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी शेतीमध्ये करण्यात येईल व त्यानंतर शेतकऱ्याला योजनेमध्ये सहभागी करण्यात येईल.

पिक विमा यादी 2023-24:-

पिक विमा यादी 2023-24 ही शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा हा बँकेमार्फत भरला आहे, ती यादी जाहीर झालेली आहे. पिक विमा यादीत शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्याची माहिती मिळेल.

https://youtube.com/watch?v=KwyULsNPEV0%3Fsi%3D3tniOv0hwdeLMwNg

पिक विमा यादी 2023-24 यादी कशी पहायची?

Crop Insurance Scheme 23-24 Maharashtra यादी बघण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन अथवा बँकेमध्ये जाऊन संबंधित पीक विम्याची यादी बघता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top