सर्वसामान्यांना एक प्रकारचे आर्थिक कवच प्राप्त व्हावे, याकरिता भारतीय डाक विभागाअंतर्गत पोस्ट ऑफिस अपघात विमा 2024 राबविण्यात येते. पोस्ट ऑफिस अपघात विमा अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो? कोणत्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल?(Which citizens will benefit from the scheme?) किती लाख रुपयांपर्यंतचे कवच अपघात विमा अंतर्गत अर्जदाराला मिळेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती संबंधित लेखांमध्ये देण्यात आलेली आहे, पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या या अपघात विम्याचा लाभ देशातील गरीब कुटुंबे सहजरीत्या घेऊ शकणार आहेत.
पोस्ट ऑफीस अपघात विमा योजना
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी दोन प्रकारे पॉलिसी काढता येते त्यामध्ये एक 299 रुपयांमध्ये काढता येतो तर दुसरा विमा 399 रुपयांचा असतो, या दोन्हीत वीमा धारकाला दहा लाख रुपये पर्यंतचे कवच देण्यात येते. पोस्ट ऑफिस अंतर्गत अपघात विमा(Post Office Antargat Apghat Vima) राबविण्यात येते. विम्याचा लाभ घेत असताना अर्जदाराला विम्याची रक्कम वार्षिक भरावी लागेल त्यामध्ये 299 अथवा 399 ही रक्कम वार्षिक विमाधारकाला भरावी लागणार आहे व वर्ष भरल्यानंतर पुढील वर्षासाठी विमा चालू ठेवायचा असल्यास पुन्हा एकदा पुढील वर्षापर्यंत रक्कम भरून विमा रिन्यू असेल.
पोस्ट ऑफीस अपघात विमा अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?
- पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेअंतर्गत भारतीय नागरिक लाभ मिळू शकतो, भारतीय नागरिकांना पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- पोस्ट ऑफिस अपघात विमा अंतर्गत लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसचे खाते असणे आवश्यक आहे. खाते असल्यास अर्जदार व्यक्ती सहज लाभ घेऊ शकेल.
- तसेच योजनेअंतर्गत काही वयोमर्यादेची आवश्यकता देण्यात आलेली असल्याने अपघात विमा योजनेअंतर्गत वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे एवढी असेल या वयोमर्यादेच्या गटातील नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- योजनेचा लाभ हा एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल एक वर्षानंतर पुन्हा रक्कम भरून नूतनीकरण करून योजना पुढील वर्षासाठी रिन्यू करता येईल.
- अशा प्रकारे वरील दिलेल्या पात्रतेमध्ये नागरिक योग्य प्रकारे पात्र ठरत असेल तर पोस्ट ऑफिस अपघात विम्याचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा:
पोस्ट ऑफीस अपघात विमा अंतर्गत लाभ
- पोस्ट ऑफिस अपघात विमा अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे या अपघात विम्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिक घेत आहे, योजने अंतर्गत जर अर्जदाराचा अपघाती मृत्यू झालेला असेल तर 10 लाख रुपये पर्यंतची मदत कुटुंबीयांना देण्यात येते.
- तसेच कुटुंबातील 2 मुलांना प्रति मुल प्रमाने एक लाख रुपये पर्यंतचा शैक्षणिक खर्च सुद्धा देण्यात येतो.
- विमाधारकाला जर कायमस्वरूपीचे अपंगत्व आलेले असेल तर दहा लाखाचा विमा देण्यात येईल.
- अपघात झाल्यानंतर विमाधारक व्यक्ती दवाखान्यामध्ये असेल तर त्याचा 10 दिवसांपर्यंतचा 1 दिवसाला 1 हजार रुपये प्रमाणे खर्च देण्यात येतो.
- विमाधारकाला दवाखान्याचा खर्च म्हणून दवाखान्यांमध्ये असल्यास 60 हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्यात येते.
- दवाखान्यातील प्रवास खर्च म्हणून कुटुंबीयांना पंचवीस हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्यात येईल.
- अपघात विमाधारकाला पॅरालिसिस झालेला असेल तर दहा हजार रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येईल.
- अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपये रक्कम देण्यात येते.
पोस्ट ऑफीस अपघात विमा अर्ज कसा करायचा?
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम भारतीय डाक विभागांमध्ये जावे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पोस्ट ऑफिस अपघात विमा अर्ज करता येईल. भारतीय डाक विभागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पोस्ट ऑफीस येथील कर्मचारी Post Office Apghat Vima Arj करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. व तुमचा विमा काढून देण्यात येईल. अशाप्रकारे तुम्हाला अर्ज करावा लागेल.
पोस्ट ऑफिस अपघात विमा 299 व 399 यांच्यातील फरक काय?
पोस्ट ऑफिस अंतर्गत दोन प्रकारचा विमा काढता येतो त्यामध्ये एका वर्षासाठी विमा कालावधी असतो 299 रुपयाची रक्कम भरून सुद्धा विमा काढता येतो तसेच 399 रुपये भरुन एका वर्षाच्या कालावधीसाठी विमा काढता येतो परंतु या दोन विम्यातील नेमका फरक काय आहे हे नागरिकांना माहीत असायला हवी. कारण कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती डिटेल्स माहिती असणे गरजेचे आहे. माहिती मिळाल्यानंतर आपण कोणत्या विम्याचा लाभ घ्यावा कोणता विमा आपण काढावा याची निश्चिती सर्व सामान्य नागरिक करू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या अपघात विमा 299 च्या विमा मध्ये ज्या व्यक्तीने विमा काढलेला असेल अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन मुलापर्यंतच्या मर्यादित प्रति मूल एक लाख रुपये पर्यंत मदर देण्यात येणार नाही व हीच मदत 399 रुपयाच्या विम्यामध्ये देण्यात येईल. 399 च्या अपघात विमामध्ये वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च तसेच शिक्षण खर्च देण्यात येईल परंतु 299 च्या अपघात विम्यामध्ये हा खर्च देण्यात येणार नाही. अशा प्रकारचा फरक या दोन अपघात विम्यामध्ये असणार त्यावरून अर्जदार व्यक्तीला कोणता विमा काढायचा आहे हे त्यांनी ठरवायला हवे.