Agricultural Land : शेजारचा शेतकरी ‘बांध’ कोरतोय, मग ‘या’ कायदेशीर मार्गाने शेतजमिनीवरील अतिक्रमण हटवा
Agricultural Land : शेती’ म्हंटलं की भांडणं आलीच. मग ते कधी शेतजमीन वाटणीच्या मुद्द्यावरून होतात तर कधी एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा बांध कोरला म्हणून होत असतात. शेताचा बांध कोरणे ही अनेक शेतकऱ्यांसाठी जणू समस्याच बनली आहे. त्यामुळे अशा लोकांना आता कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू शकता. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती..
नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा
तुमच्या जमिनीवर जर कुणी अनधिकृतपणे अतिक्रमण करत असेल तर तुम्ही ते अतिक्रमण कायदेशीररित्या हटवू शकता. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसत असते. शेतजमिनीबाबत हाच प्रकार घडत असतो. जर तुम्ही तुमच्या बांधावर काही खुणा करून ठेवलेल्या नसतील तर शेजारचा शेतकरी हा बांध कोरून अतिक्रमण करत असतो.Agricultural Land
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू
कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणाची तपासणी करा Agricultural Land
जर तुम्हाला तुमच्या शेत जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे वाटत असेल. तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने तपासणी करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा ‘क’ प्रत ही शासकीय यंत्रणा तर्फे देण्यात येते. त्या नकशांवर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात. तसेच तुमच्या कोणत्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. याची देखील माहीती देण्यात येते.Agricultural Land